लेनोवो ZUK Z2 स्मार्टफोनमध्ये आहे 4GB रॅम
ह्या फोनमध्ये 2.15GHz स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आहे. ह्यात 4GB रॅमसुद्धा दिली गेली आहे आणि हा एड्रेनो 530 GPU ने सुसज्ज आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे.
मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने आपला नवीन स्मार्टफोन ZUK Z2 लाँच केला आहे. ह्या फोनची किंमत CNY 1,799 (जवळपास १८,४०० रुपये) ठेवण्यात आली आहे. सध्यातरी हा फोन केवळ चीनमध्ये उपलब्ध आहे. ह्या फोनला 2.5D ग्लाससह लाँच केले गेले आहे. हा अॅनड्रॉईड मार्शमॅलोवर आधारित ZUI 2.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.
ह्या फोनमध्ये ५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 441ppi आहे. ह्या फोनमध्ये 2.15GHz स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर दिले आहे. ह्यात 4GB रॅमसुद्धा दिली गेली आहे आणि हा एड्रेनो 530 GPU ने सुसज्ज आहे.
हेदेखील पाहा – Wiperoid: हा अॅप ठरणार मोबाईल चोरीच्या गंभीर प्रश्नावर रामबाण उपाय
ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन 3500mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ह्या फोनचा आकार 141×68.88×8.45mm आणि वजन १४९ ग्रॅम आहे. ह्यात 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ आणि USB 2.0 टाइप-C पोर्टसारखे फीचर्स देण्यात आले आहे. ह्या फोनमध्ये होम बटनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर सुद्धा देण्यात आला आहे.
हेदेखील पाहा – यू यूनिकॉर्न स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, किंमत १२,९९९ रुपये
हेदेखील पाहा – भारतात १ जूनपासून लागू होणार गुगल टॅक्स…!!