Lenovo च्या Lenovo Z6 Pro मोबाईल फोन बद्दल अनेकदा इंटरनेट वर माहिती समोर आली आहे, पण एका नवीन माहिती नुसार हा मोबाईल फोन आता 23 एप्रिलला लॉन्च केला जाणार आहे. हा मोबाईल फोन म्हणजे Lenovo Z6 Pro मोबाईल फोन बीजिंग मध्ये होणाऱ्या एका इवेंट मध्ये लॉन्च केला जाणार आहे. या मोबाईल फोनचा एक फोटो पण शेयर करण्यात आला आहे, या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला नॉच डिजाईन दिसणार नाही. तसेच यात तुम्हाला एक हाइपर विडियोचा फीचर पण दिला जाणार आहे. हा 2.39cm मॅक्रो शूटिंगला पण सपोर्ट करतो.
कंपनी ने असा खुलासा केला आहे कि Lenovo Z6 Pro स्मार्टफोन एप्रिल मध्ये लॉन्च केला जाईल. चीनी सोशल मीडिया Weibo वर कंपनी ने एक टीजर शेअर केला आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि डिवाइस Snapdragon 855 processor ने सुसज्ज असेल आणि या महिन्यात कधीही लॉन्च केला जाऊ शकतो.
Weibo वरील एका पोस्ट मध्ये लेनोवोचे VP Chang Cheng यांनी असे संकेत दिले आहेत कि हा फोन 100 मेगापिक्सलचे फोटो घेऊ शकतो. त्याचबरोबरच असे बोलले जात आहे कि हा अपकमिंग फोन 2018 नोव्हेंबर मध्ये लॉन्च केल्या गेलेल्या Lenovo Z5 Pro चा अपग्रेड वर्जन असू शकतो. Lenovo ने वीबो वर अशी घोषणा केली आहे कि लेनोवो Z6 प्रो या महिन्यातच लॉन्च केला जाईल. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.
तसेच मोबाईल वर्ल्ड कॉन्ग्रेस 2019 मध्ये कंपनी ने सांगितले होते कि Lenovo Z6 Pro मध्ये नवीन 'हाइपरविजन' कॅमेरा असेल. त्याचबरोबर कंपनीचा दावा आहे कि हा हाइपर वीडियोज शूट करण्यासाठी पण हा डिवाइस खूप चांगला असेल. सोबतच फोन मध्ये 5जी सपोर्ट असू शकतो. कंपनी ने क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असेल असे देखील सांगण्यात आले आहे. पण रॅम आणि स्टोरेज बद्दल काहीच सांगण्यात आले नाही. जुन्या रिपोर्ट्स मध्ये 12 जीबी पर्यंतचा रॅम आणि 512 जीबी पर्यंतचा उल्लेख आहे. हा 100 मेगापिक्सलचे फोटो घेऊ शकेल.
याआधी Lenovo हा अपकमिंग फोन मार्च मध्ये लॉन्च करणार होती. सेल साठी हा फोन जून मध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो. कदाचित हा भारतीय मार्केट मध्ये पण लॉन्च केला जाईल.