5 सेप्टेंबरला हे 3 LENOVO PHONES होऊ शकतात लॉन्च, जाणून घ्या या डिवाइस बद्दल काही महत्वाच्या गोष्टी
Lenovo Z6 Pro मध्ये असू शकतो क्वाड कॅमेरा सेटअप
Lenovo Z6 Pro आधीच चीन मध्ये केला गेला आहे लॉन्च
Lenovo Note मध्ये ट्रिपल कॅमेरा असण्याची शक्यता
Lenovo ने अशी घोषणा केली आहे कि ते 5 सेप्टेंबरला भारतात एका इवेंटचे आयोजन करणार आहेत. या इवेंट मध्ये कंपनी आपला आगामी लेनोवो Z6 Pro स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. त्याचबरोबर कंपनी आपले K10 Note आणि A6 Note पण लॉन्च इवेंट मध्ये सादर करू शकते. विशेष म्हणजे कंपनीने आधीच Lenovo Z6 Pro आपला फ्लॅगशिप फोन म्हणून चीनी मार्केट मध्ये आणला आहे आणि आता हा भारतीय मार्केट मध्ये येणार आहे.
जर कंपनीने Lenovo K10 Note आणि A6 Note लॉन्च केले तर भारत पहिला देश ठरेल जिथे हे सादर केले जातील. लॉन्च साठी आलेल्या मीडिया इन्वाइट्स मध्ये फोन मध्ये ट्रिपल कॅमेरा असण्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचप्रमाणे Lenovo K10 Note मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि Lenovo A6 Note मध्ये ड्यूल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. यात यूजर्सना वाटरड्रॉप नॉच आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर पण दिला जाऊ शकतो.
विशेष म्हणजे चीन मध्ये आधीच लॉन्च झालेल्या Lenovo Z6 Pro ची खासियत याचा कॅमेरा आहे. याअंतर्गत तुम्हाला चार रियर कॅमेरा सेटअप म्हणजे क्वाड कॅमेरा मिळतो. फोन 48 मेगापिक्सलच्या एफ/ 1.8 अपर्चर वाल्या प्राइमरी सेंसर+ 16 मेगापिक्सलची सेकेंडरी वाइड अँगल लेंस+ 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस+2 मेगापिक्सलच्या सेंसर सह येतो. फोन मध्ये तुम्हाला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण मिळतो.
यात तुम्हाला 6.39 इंचाचा एमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह ग्रााफिक्स साठी एड्रेनो 640 जीपीयू इंटिग्रेटेड आहे. तसेच हा 3 रॅम वेरिएंट्स मध्ये येतो.