लॉन्चच्या आधीच Lenovo Z5s चे कॅमेरा सॅम्पल्स आले समोर

Updated on 10-Dec-2018
HIGHLIGHTS

लवकरच लॉन्च होणाऱ्या Lenovo Z5s चे कॅमेरा सॅम्पल कंपनीच्या Weibo अकाउंट वरून समोर आले आहेत.

18 डिसेंबरला लॉन्च केल्या जाणाऱ्या लेनोवोच्या नवीन स्मार्टफोन Lenovo Z5s बद्दल लीक्स येताच आहेत. TENAA वरून मिळालेली माहिती आणि सोबतच लेनोवोच्या अधिकृत पोस्टर्स वरून फोनच्या ट्रिपल रियर कॅमेराचा खुलासा झाला आहे. जर तुम्ही याची कॅमेरा परफॉर्मन्स जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्हाला ऐकून आनंद होईल की लेनोवो ने आपल्या नवीन आगामी डिवाइसचे कॅमेरा सॅम्पल्स सादर केले आहेत.
हा फोटो लेनोवो ने आपल्या अधिकृत Weibo पेज वर शेअर केले आहे. यह एक क्लोज-अप फोटो आहे आणि कॅप्शन अनुसार हा फोटो एका सेंसरच्या झूम फीचरचा नमूना सादर करत आहे. याचे कलर रिप्रोडक्शन चांगले आहे आणि सब्जेक्टची स्किन टोन नॅचरल वाटते.

अजून कॅमेराच्या स्पेसिफिकेशंस बद्दल पूर्णपणे कोणतीही माहिती मिळाली नाही पण इतकेच सांगत येत आहे की या तीन सेंसर्स मध्ये एक टेलीफोटो लेंस आहे जी ऑप्टिकल झूम सह सादर करण्यात आली आहे. इतर दोन सेंसर्स वाइड एंगल आणि डेप्थ सेंसर असण्याची शक्यता आहे.
Lenovo Z5s मध्ये बेजल-लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या टॉप वर फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला जाईल. लेनोवो ने एक नवीन पोस्टर पण रिलीज केला आहे ज्याच्या बॅक वर ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. Lenovo Z5s मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल आणि हा 3,120mAh च्या बॅटरी सह येईल जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :