Lenovo Z5 स्मार्टफोन च्या लॉन्च च्या आधी या डिवाइस बद्दल फॅन्स मध्ये उत्सुकता वाढली आहे, या डिवाइस बद्दल आता पर्यंत अनेक लीक पण समोर आले आहेत. या डिवाइस बद्दल याच्या टीजर मुळे पण काही माहिती समोर आली आहे. तसेच या डिवाइस च्या डिजाईन च्या बाबतीत पण भरपूर काही समजले आहे, आता एक नवीन लीक या डिवाइस च्या कॅमेरातून घेतलेले फोटो दाखवत आहे.
असे पण बोलले जात आहे की हा डिवाइस बेजल-लेस डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. या सोबत यात एक ड्यूल कॅमेरा असल्याची माहिती समोर येत आहे. याच्या कॅमेरा सॅम्पल बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये दमदार कॅमेरा असू शकतो, कारण यातून काढलेले काही पोर्टेट फोटो समोर आले आहेत. तसेच कंपनी चे VP Chang Cheng ने वेइबो वर याचे कॅमेरा सॅम्पल पण प्रकाशित केले आहेत.
Lenovo Z5 स्मार्टफोन मधून काढलेल्या या फोटो वर दिसणारा वाटरमार्क बघून असे वाटते की हा ड्यूल कॅमेरा सह लॉन्च केला जाईल. याव्यतिरिक्त यातील AI क्षमतेची पण माहिती मिळत आहे. तुम्ही इथे याचे काही लीक कॅमेरा सॅम्पल बघू शकता:
विशेष म्हणजे या डिवाइस बद्दल आधी पण माहिती समोर आली आहे आणि यात समोर आले होते की या डिवाइस मध्ये AI पण असेल. Mr Cheng ने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता कि या फ्लॅगशिप मॉडेल ची स्टोरेज 4TB पर्यंत वाढवता येईल. Cheng ने हे पण सांगितले की 4TB स्टोरेज मध्ये 2000 HD चित्रपट, 1 मिलियन फोटो आणि 1,50,000 म्यूजिक फाइल्स स्टोर करता येतील. याआधी Cheng ने एक स्केच च्या माध्यमातून डिवाइस टीज केले होते ज्यावरून याची थोडीशी झलक मिळाली होती.
त्याचबरोबर Lenovo Z5 95% पर्यंतचा स्क्रीन रेश्यो ऑफर करू शकतो आणि हा मेटल मिड-फ्रेम सह येऊ शकतो. डिवाइस ची बॅक ग्लास ची असेल. अजूनतरी डिवाइस बद्दल अधिक माहिती मिळाली नाही पण अशा आहे की कंपनी हा डिवाइस जून मध्ये लॉन्च करेल.