मोबाईल निर्माता कंपनी लेनोवो २७ जानेवारीला भारतात आपला नवीन स्मार्टफोन वाइब X3 सादर करेल. कंपनीने स्वत: ह्या स्मार्टफोनच्या लाँचविषयी माहिती दिली आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये लेनोवो वाइब X3 स्मार्टफोनच्या 32GB स्टोरेज प्रकाराला चीनमध्ये २,४९९ चीनी युआन (जवळपास २६,००० रुपये) मध्ये लाँच केले होते.
जर लेनोवो वाइब X3 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्ले वर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन दिले आहे. हा स्मार्टफोन हेक्सा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर आणि 3GB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
लेनोवो वाइब X3 मध्ये २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. जो सोनी IMX २३० सेंसर, LED फ्लॅश, फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि 4K व्हिडियो रेकॉर्डिंग फीचरने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे.
त्याचबरोबर ह्याच्या रियर पॅनलावर प्रायमरी कॅमे-याच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. हा हायब्रिड ड्यूल-सिम स्लॉटसह येईल. याचाच अर्थ मायक्रो-एसडी कार्डच्या वापर केल्यावर यूजर केवळ एकच सिमकार्डचा वापर करु शकेल. ह्यात 3600mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
पुढे वाचा- गणतंत्र दिनाचे निमित्त साधून फ्लिपकार्टवर आकर्षक सेल सुरु
हेदेखील वाचा- अॅमेझॉन इंडियाचा ‘ग्रेट इंडियन सेल’ सुरु