लेनोवो वाइब S1 स्मार्टफोन अखेरीस भारतात लाँच

Updated on 23-Nov-2015
HIGHLIGHTS

स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि त्याचबरोबर २ मेगापिक्सेलचा आणखी एक सेकेंडरी कॅमेरा दिला गेला आहे.

मोबाईल निर्माता कंपनी लेनोवो भारतात आपला नवीन स्मार्टफोन वाइब S1 लाँच केला आहे. कंपनीने भारतात ह्या स्मार्टफोनची किंमत १५,९९९ रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन एक्सक्लुसिव्ह ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल.

 

ह्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा ड्यूल फ्रंट कॅमे-यासह येणारा स्मार्टफोन आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, ह्याच वैशिष्ट्यामुळे यूजर्सला एक वेगळा अनुभव मिळेल. त्यामुळे  फोटोग्राफी तसेच विशेषकरुन सेल्फीला एक नवीन रुप मिळेल.

स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि त्याचबरोबर २ मेगापिक्सेलचा आणखी एक सेकेंडरी कॅमेरा दिला गेला आहे. ज्याच्या माध्यमातून आपण एक चांगला सेल्फी घेऊ शकता. त्याचबरोबर आपले फोटो अजून चांगले येण्यासाठी स्मार्टफोनमध्ये फोटो एडिटिंग टूलसुद्धा दिला गेला आहे. उदाहरणार्थ जर आपण आपल्या सेल्फीवर ब्लर करु इच्छिता, तर हा आपल्या फोटोवर कुठेही री-फोकसिंग करु शकतो.

जर ह्या स्मार्टफोनच्या इतर लीक्सवर लक्ष केंद्रीत केले असता, ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची FHD डिस्प्ले, 64-बिट मिडियाटेक ऑक्टा-कोर 1.7GHz प्रोसेसरसह 3GB ची रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 2500mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. ह्या स्मार्टफोनचे वजन १३० ग्रॅम आहे आणि 143 x 70.8 x 7.85mm परिमाणासह लाँच होईल. त्याचबरोबर हा काळा, पांढरा, निळा, जांभळा आणि गुलाबी रंगात मिळेल. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.० लॉलीपॉपवर चालतो. त्याशिवाय कनेक्टव्हिटीसाठी ह्यात 4G LTE वैशिष्ट्य दिले आहे.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :