हा स्मार्टफोन 64 बिट क्वाड-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128पर्यंत वाढवू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने वाइब S1 स्मार्टफोनच्या किंमतीत बरीच घट केली आहे. लेनोवोने आपल्या ह्या फोनची किंमत ३,००० रुपयांनी कमी केली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन आजपासून १२,९९९ रुपयात मिळेल. नव्या किंमतीसह हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल. ही माहिती लेनोवो इंडियाने ट्विट केली आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 64 बिट क्वाड-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. ह्यात 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्याशिवाय ह्यात कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE फीचर दिले गेले आहे. हा ७.८ एमएम इतका पातळ आहे आणि ह्याचे वजन १३२ ग्रॅम आहे. हा डिवाअस पर्ल व्हाइट आणि मिडनाइट ब्लू रंगात उपलब्ध होईल.