गीकबेंच बेंचमार्क एक नाव नसलेला लेनोवोचा एक स्मार्टफोन लेनोवो P2c72 स्मार्टफोन दाखवला गेला आहे. ह्या लिस्टिंगनुसार, हा स्मार्टफोन लेनोवो वाइब p1 च्या पीढीचाच स्मार्टफोन असल्याचे दिसत आहे, ज्याला लेनोवो वाइब P2 अशा नावाने लाँच केले जाईल.
जर ह्याच्या टेस्टमध्ये ह्याच्या स्कोर्सवर नजर टाकली तर, ह्याला सिंगल कोरमध्ये 922 आणि मल्टीकोरमध्ये 4896 स्कोर मिळाला आहे. त्याशिवाय ह्यात 4GB रॅमसुद्धा असणार आहे. ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट दिला गेला आहे. हा 2GHz चा ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर ओएसवर चालतो.
लेनोवो वाइब P1 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे, ह्यावर कोर्निंग गोरिला ग्लास 3 चे प्रोटेक्शन दिले आहे, त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.5GHz स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टा-कोर प्रोसेसर, एड्रेनो 405 GPU आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे.
हेदेखील वाचा – अॅप्पल आयफोन 7 ची आणखी काही फोटोज झाले ऑनलाइन लीक
हेदेखील वाचा – शाओमी रेडमी प्रो स्मार्टफोन लाँच, 4GB रॅमने सुसज्ज