मोबाईल निर्माता कंपनी लिनोवोने आज भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स वाइब P1 आणि वाइब P1M लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील.
ह्यातील वाइब P1 ची किंमत १५,९९९ रुपये आहे तर वाइब P1M ची किंमत ७,९९९ रुपये आहे. ह्या दोन्ही फोनचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ह्यात असलेली मोठी बॅटरी. हे दोन्ही फोन फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील. ह्यात P1 हा २७ ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल तर P1m २८ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल, मात्र ह्याची नोंदणी प्रक्रिया आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरु होईल.
लिनोवो वाइब P1 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाचा पुर्ण HD IPS डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचे रिझोल्युशन १०८०x१९२० पिक्सेल आहे. ह्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ ने संरक्षित केले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये १.५ गिगाहटर्ज स्नॅपड्रॅगन ६१५ ऑक्टा-कोर प्रोसेसर, एड्रेनो ४०५GPU आणि ३जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये १६ जीबीचे अंतर्गज स्टोरेजसुद्धा दिले आहे.
त्याशिवाय लिनोवो वाइब P1मध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्यात ५०००mAhची बॅटरीसुद्धा दिली आहे. हा अॅनड्रॉईड ५.१ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हया स्मार्टफोनमध्ये दोन सिम स्लॉट 4G LTE सपोर्ट करतात. हा स्मार्टफोन प्लॅटिनम, ग्रेफाइट ग्रे आणि गोल्ड अशा तीन रंगांत उपलब्ध होईल.
तसेच जर लिनोवो वाइब P1m स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्युशन ७२०x१२८० पिक्सेल आहे. त्याचबरोबर ह्यात ६४ बिट क्वाड-कोर मीडियाटेक MT6735 प्रोसेसर आणि २जीबीची रॅम आहे. हा स्मार्टफोन १६ जीबी अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकता. ह्यात ४०००mAh ची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे. तसेच ह्यात ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.