मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी लेनोवोने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन वाइब K5 लाँच केला आहे. ह्या फोनला ऑनलाइन शॉपिंह साइट अॅमेझॉनवर खरेदी केले जाऊ शकते.ह्या फोनसाठी आज दुपारी १ वाजल्यापासून रजिस्ट्रेशन सुरु झाली आहे, ह्याची पहिली फ्लॅश सेल २२ जूनला दुपारी २ वाजल्यापासून सुरु होईल. कंपनीने भारतीय बाजारात आपल्या ह्या फोनची किंमत ६,९९९ रुपये ठेवली आहे. हा फोन सोनेरी, सिल्वर आणि ग्रे रंगात उपलब्ध होईल.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले दिली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा फोन 1.2GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 415 प्रोसेसर आणि 2GB च्या DDR3 रॅमने सुसज्ज आहे. फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्या स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग
ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा फोन 2750mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. ह्याचे वजन 142x71x8.2mm आणि वजन 150 ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, ब्लूटुथ सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – शाओमी Mi5 आता अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, स्नॅपडिल आणि टाटा क्लिकवर सुद्धा उपलब्ध
हेदेखील वाचा – 2GB रॅमने सुसज्ज आहे RDP थिन बुक लॅपटॉप लाँच, किंमत ९,९९९ रुपये