लेनोवो वाइब K5 प्लस स्मार्टफोन भारतात लाँच
हा स्मार्टफोन 616 ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने आज दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आपला नवीन स्मार्टफोन वाइब K5 प्लस लाँच केला. कंपनीने भारतात आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ८,४९९ रुपये आहे.
लेनोवो वाइब K5 प्लस स्मार्टफोन २३ मार्चला दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर एक्सक्लुसिवरित्या विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्या सेलसाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.
लेनोवो वाइब K5 प्लस स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 616 ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. तसेच ह्यात 2GB चे रॅम देण्यात आले आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 2,750mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा हँडसेट 5.1 लॉलीपॉपवर चालतो.
ह्या फोनचे डायमेंशन 142x71x8.2 मिलीमीटर आणि १५० ग्रॅम वजन आहे. ह्यात 4G LTE बँडसाठी सपोर्ट आहे. इतर कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटुथ 4.1, मायक्रो-USB 2.0 आणि FM रेडियो यांचा समावेश आहे. लेनोवो वाइब K5 प्लस डॉल्बी एटमॉस साउंड इंटिग्रेशनसह येतील.
हेदेखील वाचा – भारतात २७,००० किंमतीचा असू शकतो शाओमी Mi 5
हेदेखील वाचा – अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)