२९ जूनला होणार लेनोवो वाइब K5 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅशसेल

२९ जूनला होणार लेनोवो वाइब K5 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅशसेल
HIGHLIGHTS

लेनोवो वाइब K5 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅशसेल २९ जूनला होणार आहे. हा ऑनलाइन शॉपिंग साइट वेबसाइट अॅमेझॉन इंडियावर केला जाईल.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी लेनोवोने भारतीय बाजारात आपला नवीन फोन वाइब K5 लाँच केला होता आणि ह्या फोनचा फ्लॅशसेल २२ जूनला आयोजित करण्यात आला होता. आता लेनोवोने अशी माहिती दिली आहे की, ह्याचा दुसरा फ्लॅशसेल २९ जूनला ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर केला जाईल. कंपनीने अशी माहिती दिली आहे की, ह्या स्मार्टफोनच्या पहिल्या फ्लॅशसेलमध्ये ह्या फोनचे ५२,००० यूनिट्स विकले गेले तर ४ लाख रजिस्ट्रेशन झाले होते.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले दिली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा फोन 1.2GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 415 प्रोसेसर आणि 2GB च्या DDR3 रॅमने सुसज्ज आहे. फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्या स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

 

हेदेखील वाचा – अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

 

ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा फोन 2750mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. ह्याचे वजन 142x71x8.2mm आणि वजन 150 ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, ब्लूटुथ सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

हेदेखील वाचा – मोटो G4 स्मार्टफोन झाला भारतात विक्रीसाठी उपलब्ध, किंमत ,१२,४९९ रुपये
हेदेखील वाचा – 
स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत ६,४९९ रुपये

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo