लेनोवो वाइब K4 नोटची किंमत झाली १०००रुपयांनी कमी
हा स्मार्टफोन आज अॅमेझॉन इंडियावर १०,९९९ रुपयांच्या किंमतीत मिळत आहे. ही ऑफर केवळ आज रात्रीपर्यंतच असणार आहे.
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा लेनोवो वाइब K4 नोट १०,९९९ रुपयात
मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने अलीकडेच लाँच केलेल्या लेनोवो वाइब K4 नोटच्या किंमतीत १००० रुपयांनी घट झाली आहे. आता हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर १०,९९९ रुपयात मिळत आहे. मात्र ही ऑफर केवळ आज मध्यरात्रीपर्यंतच आहे. लाँचिंगवेळी ह्या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये होती.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080p आहे. हा कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 441ppi आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 64 बिट मिडियाटेक MT6753 ऑक्टा-कोर प्रोसेसर, माली T-720-MP3 दिला गेला आहे. तसेच ह्यात 3GB चे रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला १२८ जीबी पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील पाहा – लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक
ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा PDAF रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 3300mAh ची बॅटरी देण्यात आली असून हा अॅनड्रॉईड ५.१ वर चालतो. .
तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात GPRS,EDGS, HSPA, LTE सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ह्यात 2G, 3G आणि 4G सपोर्टसुद्धा आहे.
हेदेखील वाचा – LeMall ह्या शॉपिंग पोर्टलवर केवळ १ रुपयात मिळतोय LeEco Le 2 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – २०१७ च्या सुरुवातीला सॅमसंग लाँच करु शकतो आपला बेंडेबल स्क्रीन असलेले स्मार्टफोन्स:ब्लूमबर्ग