लेनोवोने बाजारात आपला एक नवीन स्मार्टफोन वाइब C2 पॉवर लाँच केला. हा फोन नॉर्मल वाइब C2 पेक्षा बॅटरी आणि रॅमच्या बाबतीत थोडा वेगळा आहे. ह्या नवीन फोनचे डायमेंशन आणि वजनसुद्धा मूळ मॉडलपेक्षा थोडे वेगळे आहे. वाइब C2 पॉवर स्मार्टफोनमध्ये 2GB ची रॅम देण्यात आली आहे, तर C2 मध्ये 1GB ची रॅम आहे. ह्या नवीन फोनमध्ये 3500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. वाइब C2 पॉवरचा आकार 143×71.4×9.54mm आणि वजन 155.6 ग्रॅम आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल आहे. हा 1GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6735P प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या फोनच्या स्टोरेजला वाढवले जाऊ शकते. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.
हेदेखील पाहा – [Marathi] LeEco Super 3 TVs – LeEco सुपर 3 टीव्ही फर्स्ट लूक
ह्या फोनमध्ये 8MPचा रियर कॅमेरा दिला आहे, जो LED फ्लॅशसह येतो. तसेच 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा फोन ड्यूल सिमला सपोर्ट करतो आणि ह्यात 4GB LTE, वायफाय, ब्लूटुथ 4.0, GPS/A-GPS आणि मायक्रो-USB 2.0 पोर्ट दिले आहे.
हेदेखील वाचा – १६ ऑगस्टला लाँच होणार Le Eco-coolpad कूल 1 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून क्रिओ मार्क 1 च्या किंमतीत 30 टक्क्यांची घट