लेनोवो वाइब C2 स्मार्टफोन: अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ने सुसज्ज
ह्या फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळेल.
लेनोवोने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन वाइब C2 लाँच केला आहे. सध्यातरी कंपनीने आपल्या वेबसाइटवर हा स्मार्टफोन लिस्ट केला आहे. तथापि, ह्या लिस्टिंगमध्ये ह्या फोनची किंमत आणि उपलब्धतेविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
लेनोवो वाइब C2 स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा फोन 1GHz क्वाड-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे.
हेदेखील पाहा – [Marathi] Le Eco Le 1S Overview – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू
तसेच ह्यात 1GB रॅम देण्यात आली आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, जे आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवूही शकतो.
हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…
ह्या फोनमध्ये 16GB अंतर्गत स्टोरेजचाही पर्यायसुद्धा मिळेल, असे सांगण्यात येत आहे. हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा 2750mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
ह्यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.
हेदेखील वाचा – मेटल बॉडीने सुसज्ज असेल मिजू MX6 स्मार्टफोन
हेेदेखील वाचा – एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज