लेनोवो वाइब C स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत ६,९९९ रुपये

Updated on 26-May-2016
HIGHLIGHTS

हा डिवाइस अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1 वर चालतो. ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी लेनोवोने भारता आपला नवीन फोन वाइब C लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात आपल्या ह्या फोनची किंमत ६,९९९ रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन भारतात थर्ड-पार्टी ऑनलाइन रिटेलर्सच्या माध्यमातून विकला जाईल. त्याचबरोबर हा डिवाइस ऑफलाइन स्टोर्सवरसुद्धा मिळेल.
 

फोन रडारच्या रिपोर्टनुसार, ह्या फोनमध्ये पॉलिकार्बोनेट बॉडी दिली गेली आहे. हा 4G LTE सह लाँच केला आहे. ह्या फोनमध्ये 1.1GHz स्नॅपड्रॅगन 210 क्वाड-कोर प्रोसेसरसुद्धा आहे. हा फोन FWVGA डिस्प्लेसह येतो.

हेदेखील वाचा – हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच

ह्या फोनमध्ये 1GB रॅम दिली गेली आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. हा डिवाइस अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1 वर चालतो. ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा सुद्धा दिला आहे. फोनमध्ये 2300mAh ची बॅटरी दिली आहे. फोन 4G, ब्लूटुथ, वायफाय आणि GPS सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येतो.

हेदेखील वाचा – फ्लिपकार्टवर मिळत आहे स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि इतर गॅजेट्सवर भारी सूट

हेदेखील वाचा – आसूस झेनपॅड 8, झेनपॅड 10 टॅबलेट लाँच, अॅनड्रॉईड मार्शमॅलोने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :