Lenovo S5 स्मार्टफोन आज होऊ शकतो लॉन्च, 6000mAh क्षमता असलेली बॅटरी आणि AI-आधारित एंड्राइड Oreo असू शकतो याची खासियत
Lenovo आज चीन मध्ये आपला नवीन स्मार्टफोन Lenovo S5 लॉन्च करणार आहे, हा स्मार्टफोन Xiaomi च्या Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन ला टक्कर देण्याच्या उद्देशाने लॉन्च करण्यात येत आहे.
Lenovo आज चीन मध्ये आपला नवीन स्मार्टफोन Lenovo S5 लॉन्च करणार आहे, हा स्मार्टफोन Xiaomi च्या Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन ला टक्कर देण्याच्या उद्देशाने लॉन्च करण्यात येत आहे. हा स्मार्टफोन म्हणजे Lenovo S5 कंपनी च्या S सीरीज चा पहिल्या स्मार्टफोन च्या रुपात लॉन्च केला जाईल. या स्मार्टफोन मध्ये खुप खास फीचर असणार आहेत. आणि याच मुळे हा Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन ला मोठी टक्कर देईल.
वर सांगितल्याप्रमाणे हा स्मार्टफोन आज चीन मध्ये लॉन्च होणार आहे. पण याबद्दल कंपनी ने अधिकृत पणे काहीही नाही सांगितले. पण असा अंदाज लावला जात आहे की हा स्मार्टफोन या महिन्याच्या शेवटी सेल साठी उपलब्ध करण्यात येईल. याव्यतिरिक्त या स्मार्टफोन ची इतर माहिती तुम्हाला आज याच्या लॉन्च नंतर मिळणारच आहे.
या स्मार्टफोन च्या स्पेक्स बद्दल अजुन पर्यंत अधिकृत पणे काहीही समोर आले नाही पण आता पर्यंत समोर आलेल्या लीक इत्यादी नुसार, असे समोर येत आहे की स्मार्टफोन मध्ये एक 5.65-इंचाचा एक 1080×2160 पिक्सल रेजोल्यूशन वाला FHD+ डिस्प्ले 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह येईल. सोबतच स्मार्टफोन मध्ये एक ओक्टा-कोर प्रोसेसर पण असणार आहे, जो 2GHz च्या स्पीड सह येईल. फोनला 4GB आणि 6GB रॅम च्या ऑप्शन्स मधे सादर केला जाईल.
फोन च्या कॅमेरा बद्दल बोलायाचे झाले तर तुम्हाला माहितीच आहे की स्मार्टफोन बद्दल आता पर्यंत अधिकृत पणे काहीच समोर आले नाही पण असा अंदाज लावला जात आहे की यात एक ड्यूल कॅमेरा सेटअप असू शकतो. पण यातील दोन सेंसर इत्यादी बाबतीत अजून पर्यंत जास्त माहिती समोर आली नाही. पण स्मार्टफोन मध्ये सेल्फी साठी एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
फोन मध्ये एक 6000mAh क्षमता असलेली बॅटरी पण असणार आहे. तसेच हा एंड्राइड Oreo सह लॉन्च केला जाऊ शकतो.