Lenovo S5 स्मार्टफोन ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह झाला लॉन्च, जाणून घ्या याचे स्पेसिफिकेशन

Updated on 21-Mar-2018
HIGHLIGHTS

Lenovo ने आपल्या lenovo S5 स्मार्टफोन ला मंगळवारी चीन मध्ये एका इवेंट दरम्यान सादर केले आहे.

Lenovo ने चीन मध्ये आपल्या Lenovo S5 स्मार्टफोन ला लॉन्च केले आहे, हा स्मार्टफोन एका 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहे. इतर खासियत पाहता हा स्मार्टफोन फुल-मेटल बॉडी, 2.5D कर्व स्क्रीन सह बाजारात आणला गेला आहे. या सोबत या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक फेस अनलॉक फीचर पण मिळत आहे. तसेच या इवेंट दरम्यान कंपनी ने आपले दोन नवीन बजेट स्मार्टफोंस lenovo K5 आणि lenovo K5 Play स्मार्टफोंस लॉन्च केले आहेत, हे दोन्ही स्मार्टफोंस ड्यूल कॅमेरा सेटअप सह आले आहेत. 
Lenovo S5 स्मार्टफोन च्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर याची सुरवाती किंमत CNY 999 म्हणजे जवळपास Rs. 10,300 ने होते. ही किंमत स्मार्टफोन च्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट ची आहे. तसेच याच्या 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत CNY 1,199 म्हणजे जवळपास Rs. 12,400 आहे. सोबत याच्या दुसर्‍या एका मॉडेल ची म्हणजे 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत CNY 1,499 म्हणजे जवळपास Rs. 15,400 आहे.  
या सर्व मॉडेल साठी कंपनी च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते, तसेच हे सेल साठी 23 मार्चला उपलब्ध होतील. हे सर्व वेरिएंट ब्लॅक आणि रेड रंगात उपलब्ध आहेत. 
याव्यतिरिक्त या स्मार्टफोन चे स्पेक्स पाहिले तर या स्मार्टफोन मध्ये एक 5.7-इंचाचा FHD+ IPS डिस्प्ले 1080×2160 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. सोबतच यात एक ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर पण देण्यात आला आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 2GHz चा आहे. आणि तुम्हाला माहित आहेच की हा फोन 3GB आणि 4GB रॅम वाल्या ऑप्शन्स मधे उपलब्ध आहे. 
फोन मध्ये फोटोग्राफी साठी एक ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो 13-मेगापिक्सल च्या दोन सेंसर चा कॉम्बो आहे. या सोबत या स्मार्टफोन मध्ये एक 16-मेगापिक्सल चा फिक्स्ड फोकस फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. फोन मध्ये एक 3000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. असा अंदाज लावला जात होता कि हा स्मार्टफोन एका 6000mAh क्षमता असलेल्या बॅटरी सह लाँच केला जाईल पण तसे झाले नाही. 
मुख्य इमेज: GSMarena
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :