लेनोवोने बाजारात आपले नवीन स्मार्टफोन्स PHAB2 ला लेनोवो टेक वर्ल्डमध्ये लाँच केले. हा कार्यक्रम सेन फ्रान्सिस्कोला झाला. ह्या नवीन स्मार्टफोन PHAB2 प्रो सह कंपनीने दोन नवीन स्मार्टफोन्सही लाँच केले आहेत. हे फोन्स आहेत PHAB2 प्लस आणि PHAB2. ह्या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने गुगलच्या 3D मॅपिंग तंत्रज्ञानाने लाँच केले होते. गुगलच्या प्रोजेक्ट टँगोवर आधारित कंपनीचा PHAB2 प्रो स्मार्टफोन मोशन ट्रॅकिंगसह लाँच झाला.
ह्या स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरसह DSP, IPS आणि आधीपासून असलेला सेंसर हबसुद्धा मिळत आहे. ज्याच्या माध्यमातून आपण बरेच आधुनिक काम करु शकतो. आणि जर तुम्हाला टँगोचा अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्याला ह्यासोबत डॉल्बी ऑडियो ™ capture 5.1 सह डॉल्बीची अॅटमॉस क्षमता मिळत आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला ट्रिपल एरे मायक्रोफोन आणि 16MP चा रियर कॅमेरा मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 6.4 इंचाची इंटेलिजेंट Assertive डिस्प्ले मिळत आहे, ज्याचे रिझोल्युशन 2560×1440 पिक्सेल आहे. ह्यात 4GB च्या रॅमसह 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 4050mAH क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे.
तर PHAB2 प्लसमध्ये आपल्याला 13MP चा रियर कॅमेरा f/2.0 लेन्सेंस सह मिळत आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. ह्यात 6.4 इंचाची FHD डिस्प्ले 2.5G कर्व्ह्ड ग्लाससह मिळत आहे.त्याशिवाय ह्यात मिडियाटेक MTK8783 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला 3GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण 128GB पर्यंत वाढवू शकतो.
PHAB2 मध्ये 6.4 इंचाची 1280×720 रिझोल्युशन डिस्प्ले मिळत आहे. त्यात आपल्याला मिडियाटेक MTK 8735 क्वाड-कोर प्रोसेसर मिळत आहे. त्याशिवाय आपल्याला 3GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण वाढवूही शकतो. ह्यात 13MP चा PDAF रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे.
हेदेखील वाचा – Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स लाँच, किंमत अनुक्रमे ३९९९ रुपये, २४९९ रुपये
हेदेखील वाचा – नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनला मिळाले नवीन सिक्यूरिटी अपडेट