मोबाईल निर्माता कंपनी लिनोवोने भारतात आपले दोन डिवाईस फॅब प्लस आणि योगा टॅब ३ लाँच केले आहेत. कंपनीने फॅब प्लसची किंमत २०,९९० रुपये ठेवली आहे. लिनोवो फॅब प्लस भारतामध्ये ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल. तर ऑफलाईनसाठी कंपनीने क्रोमा आणि रिलायन्स स्टोअर्सशी भागीदारी केली आहे.
लिनोवो फॅब प्लसची खास गोष्ट म्हणजे, ह्याला टॅबलेट आणि स्मार्टफोन अशा दोन्ही प्रकारे वापरले जाऊ शकते. हा एक 4G LTE डिवाईस आहे.
जर ह्याच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, लिनोवो फॅब प्लसमध्ये ६ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर हा डिव्हाईस २जीबी रॅम आणि ३२ जीबीच्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
तर लिनोवो योगा टॅब ३ ची किंमत १६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा ऑक्टोबरच्या शेवटी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. योगा टॅब ३ मध्ये १८० अंशाचा रोटेटिंग कॅमेरा दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्या डिवाईसची विशेषता म्हणजे ह्याची बॅटरी आहे. कंपनीनुसार २० तासापर्यंत ह्या बॅटरीची लाईफ आहे.
त्याशिवाय ह्यात आणखी एक खास गोष्ट आहे ती म्हणजे, हा टॅबलेट अॅनीपॅन तंत्राने बनलेला आहे. याचाच अर्थ असा की, ग्राहक ह्यात कोणत्याही पेनचा वापर करु शकतो.