लेनोवो फॅब फॅबलेट: १३ मेगापिक्सेलच्या रियर कॅमे-याने सुसज्ज
लेनोवो फॅब फॅबलेटमध्ये LED फ्लॅश असलेला 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा ऑटोफोकस फीचरने सुसज्ज आहे. ह्या डिवाइसमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी लेनोवोने भारतीय बाजारात आपला नवीन फॅबलेट लेनोवो फॅब लाँच केला आहे. लेनोवोने भारतात आपल्या ह्या फॅबलेटची किंमत ११,९९९ रुपये ठेवली आहे. हा डिवाइस एक्सक्लूसिवरित्या ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
जर लेनोवो फॅब फॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 6.98 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा डिवाइस 64 बिट 1.2GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला 64GB पर्यंत मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
लेनोवो फॅब फॅबलेटमध्ये LED फ्लॅश असलेला 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा ऑटोफोकस फीचरने सुसज्ज आहे. ह्या डिवाइसमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोनमध्ये 4250mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G, ब्लूटुथ 4.0, वायफाय 802.11 A/B/G/N, GPS, 3.5mm ऑडियो जॅक, FM रेडियो आणि मायक्रो-USB फीचर्स आहेत. हा एक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी सेंसर, एंबियंट लाइट सेंसर आणि डिजिटल कंपासने सुसज्ज आहे.
हेदेखील वाचा – आयफोन SE, आयपॅड प्रो आता अधिकृतरित्या भारतात उपलब्ध
हेदेखील वाचा – LeEco Le 2 स्मार्टफोन टीनावर लिस्ट,१६ मेगापिक्सेल कॅमे-याने सुसज्ज