मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लेमन 3 लाँच केला आहे. चीनमध्ये लाँच केल्या गेलेल्या ह्या स्मार्टफोनची किंमत RMB 699 (जवळपास ७,००० रुपये) ठेवण्यात आली आहे.
लेनोवो लेमन 3 स्मार्टफोन सिल्वर आणि गोल्ड रंगात उपलब्ध आहे आणि ह्याची प्री-ऑर्डर बुकिंग कंपनीच्या शॉपिंग वेबसाइटवरुन केली जाऊ शकते.
लेनोवो लेमन 3 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 441ppi आहे. हा स्मार्टफोन 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात ग्राफिक्ससाठी एड्रेनो 405GPU दिले आहे. ह्यात १६ जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवले जाऊ शकते.
लेनोवो लेमन 3 स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. लेनोवो लेमन 3 एक ड्युल सिम ड्यूल स्टँडबाय 4G स्मार्टफोन आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE नेटवर्क, ब्लूटुथ, वायफाय, USB 2.0 आणि GPS ला सपोर्ट करतो. स्मार्टफोनचे परिमाण 142x71x7.99mm आहे आणि ह्याचे वजन 142 ग्रॅम आहे. ह्यात 2750mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीनुसार, 4G नेटवर्कवर १५ दिवसांचा स्टँडबाय टाइम देईळ आणि 2G नेटवर्कवर ३२ तासांचा टॉकटाइम देईल.
चीनच्या बाहेरील अन्य बाजारांत लेमन 3 ची उपलब्धता आणि किंमतीविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.