16GB RAM सह Lenovo Legion Y70 फोन लॉन्च, किंमतही कमी

16GB RAM सह Lenovo Legion Y70 फोन लॉन्च, किंमतही कमी
HIGHLIGHTS

फ्लॅगशिप फोन Lenovo Legion Y70 लाँच

नव्या फोनची सुरुवातीची किंमत सुमारे 34,908 रुपये

फोनमध्ये तुम्हाला 16 GB रॅम मिळणार आहे

स्मार्टफोन ब्रँड Lenovo ने आपला फ्लॅगशिप फोन Lenovo Legion Y70 लाँच केला आहे. हा फोन सध्या देशांतर्गत बाजारात सादर करण्यात आला आहे. या फोनसोबत कंपनीने Xiaoxin Pad Pro 2022 टॅबलेट देखील बाजारात आणला आहे. Lenovo Legion Y70 फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि 6.67-इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये 16 GB पर्यंत रॅम आणि 512 GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनसाठी सपोर्टही दिला गेला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती…. 

हे सुध्दा वाचा : Realme 9i 5G भारतात लॉन्च, कमी किमतीत मिळतोय उत्तम कॅमेरा आणि प्रोसेसर, जाणून घ्या फीचर्स

Lenovo Legion Y70 चे स्पेसिफिकेशन्स

Lenovo Legion Y70 मध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 nits ब्राइटनेससह 6.67-इंच फुल HD + OLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनला देखील सपोर्ट करतो. Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि लिक्विड व्हेपर चेंबर फीचर फोनमध्ये उपलब्ध आहे.

त्याबरोबरच, यामध्ये मध्ये 5,100mAh बॅटरी आहे, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त, फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, जो 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा सेकंडरी आणि 2 मेगापिक्सेलचा तिसरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Lenovo Legion Y70 किंमत

हा फोन गेमिंग फोन म्हणून लाँच करण्यात आला आहे. यात आइस व्हाईट, टायटॅनियम ग्रे आणि फ्लेम रेड असे तीन कलर ऑप्शन मिळतील. तसेच हा फोन तीन स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे. 128 GB स्टोरेजसह फोनच्या 8 GB रॅमची किंमत 2,970 युआन म्हणजेच सुमारे 34,908 रुपये आहे. तर 12 GB रॅमसह 256 GB स्टोरेज 3,370 युआन म्हणजेच अंदाजे 39,611 रुपये आणि 512 GB स्टोरेजसह 16 GB रॅम 4,270 युआन म्हणजेच अंदाजे 50,157 रुपये आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo