लेनोवोने आपला K सीरिजचा एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला. ह्या स्मार्टफोनचे नाव आहे लेनोवो वाइब K5 नोट. ह्या स्मार्टफोनचे दोन वेरियंट्स उपलब्ध आहेत, ज्यात 3GB आणि 4GB रॅमचा समावेश आहे. ह्या दोन्ही स्मार्टफोनची किंमत क्रमश: ११,९९९ रुपये आणि १३,४९९ रुपये आहे. त्याचबरोबर ह्याला आपण फ्लिपकार्टच्या ओपन सेलच्या माध्यमातून ३ ऑगस्टपासून खरेदी करु शकता.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची FHD LTPS डिस्प्ले सह 13MP चा रियर आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. त्याशिवाय फोनमध्ये 3500mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ह्यात एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा मिळत आहे, जो स्मार्टफोनच्या मागील बाजूला आहे.
हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू
ह्यात 1.8GHz मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर मिळत आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालतो.
हेदेखील वाचा – फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…
त्याचबरोबर आपल्याला ह्या स्मार्टफोनमध्ये थिएटरमॅक्स तंत्रज्ञानाचा वापर करु शकता. ज्याने आपण ANT VR हेडसेटसह वापरु शकतो. ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण थिएटरसारखा आनंदही घेऊ शकता.
लेनोवो वाइब K5 नोटविषयी सांगायचेच झाले तर, हा स्मार्टफोन ह्या किंमतीत येणा-या शाओमी रेडमी नोट 3 आणि LeEco Le2 स्मार्टफोनला कडक टक्कर देईल.
हेदेखील वाचा – Rcom ने लाँच केला नवीन MoviNet प्लान, किंमत २३५ रुपये प्रति महिना
हेदेखील वाचा – TCL 562 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १०,९९० रुपये