भारतात आज लाँच होणार लेनोवो वाइब K5 प्लस स्मार्टफोन
हा स्मार्टफोन 616 ऑक्टाकोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने अलीकडेच MWC २०१६ मध्ये आपला नवीन स्मार्टफोन लेनोवो वाइब K5 प्लस लाँच केला होता. कंपनीने अशी माहिती दिली आहे की, १५ मार्च म्हणजेच आज ही एका कार्यक्रमाचे आयोजन करत आहे, ज्यासाठी प्रेस निमंत्रणसुद्धा पाठवले गेले आहेत. आशा आहे की, कंपनी आज वाइब K5 प्लस लाँच करेल.
कमी किंमतीत हा डॉल्बी Atmos साउंड सिस्टमने सुसज्ज आहे. डॉल्बी जास्तकरुन महागड्या अशा प्रीमियम स्मार्टफोन जसे HTC वन M9 आणि LG G4 सारख्या फोनमध्ये येतात. लेनोवो वाइब K5 प्लसला अॅल्युमिनियम फिनिश दिला गेला आहे. जो एक मेटल बॉडी लूक देतो.
लेनोवो वाइब K5 प्लस स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 616 ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
हेदेखील पाहा – कूलपॅड नोट 3 लाइटची पहिली झलक Video
ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 2,750mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)
हेदेखील पाहा – फोटो एडिटिंग करणारे ५ उत्कृष्ट अॅप्स
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile