लेनोवो वाइब K4 नोट चा वूडन व्हर्जन लाँच, किंमत ११,४९९ रुपये

Updated on 14-Jul-2016
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा लेनोवो वाइब K4 नोट (वूडन एडिशन) ११,४९९ रुपये

मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने भारतात वाइब K4 नोट वुडन व्हर्जन लाँच केला आहे. ह्याची किंमत ११,४९९ रुपये आहे आणि हा ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

 

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080p आहे. हा कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 441ppi आहे.

 

ह्या स्मार्टफोनमध्ये 64 बिट मिडियाटेक MT6753 ऑक्टा-कोर प्रोसेसर, माली T-720-MP3 दिला गेला आहे. तसेच ह्यात 3GB चे रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला १२८ जीबी पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…

ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा PDAF रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 3300mAh ची बॅटरी देण्यात आली असून हा अॅनड्रॉईड ५.१ वर चालतो.

हेदेखील पाहा – [Marathi] Le Eco Le 1S Overview – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू


तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात GPRS,EDGS, HSPA, LTE सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ह्यात 2G, 3G आणि 4G सपोर्टसुद्धा आहे.  

 

हेदेखील वाचा – मेटल बॉडीने सुसज्ज असेल मिजू MX6 स्मार्टफोन
हेेदेखील वाचा – 
एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :