लेनोवो K4 नोट स्मार्टफोन 4G सपोर्टसह लाँच

लेनोवो K4 नोट स्मार्टफोन 4G सपोर्टसह लाँच
HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनमध्ये 64 बिट मिडियाटेक MT6753 ऑक्टा-कोर प्रोसेसर, Mali T 720-MP3 (up to 450MHz 3D graphics accelerator) GPU ला 3GB ऱॅमसह दिले गेले आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ज्याला 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोनो आज आपला नवीन स्मार्टफोन K4 नोट भारतात लाँच केला. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये ठेवली आहे. ह्या स्मार्टफोनसह कंपनी AntVR चा हेडसेटसुद्धा देत आहे, ज्याची किंमत १,२९९ रुपये आहे. म्हणजे एकूणच AntVR हेडसेट आणि लेनोवो K4 नोट आपल्याला १२,४९९ रुपयात मिळेल. ह्या स्मार्टफोनला आपण ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर खरेदी करु शकता. ह्या स्मार्टफोनच्या १९ जानेवारीपासून होणा-या विक्रीसाठी आज दुपारी ३ वाजल्यापासून नोंदणी सुरु झाली आहे.

 

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. हा डिस्प्ले 178 डिग्री वाइड व्ह्यूविंग अँगल्स आणि 1080p रिझोल्युशनसह दिली गेली आहे. ह्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षणसुद्धा दिले आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे आणि पिक्सेल तीव्रता 441ppi आहे. स्मार्टफोनमध्ये ६४ बिट मिडियाटेक MT6753 ऑक्टा-कोर प्रोसेसर, Mali T 720-MP3 (up to 450MHz 3D graphics accelerator) GPU ला 3GB ऱॅमसह दिले गेले आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते.   

ह्यात १३ मेगापिक्सेलचा PDAF चा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 3300mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 वर चालेल. लेनोवो K4 नोट स्मार्टफोन ड्यूल-स्पीकर सेटअपसह सादर केला गेला आहे, जो डॉल्बी अट्मोसकडून दिले गेले आहेत. हे डिस्प्लेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आहे. ह्या स्टीरियो सेटअपकडून उत्कृष्ट ऑडियो आऊटपुटची अपेक्षा व्यक्त केली जातेय. फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा दिला गेला आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी GPRS, EDGE, HSPA+, LTE आहे. हा स्मार्टफोन ड्यूल मायक्रोसिम सपोर्ट करतो. त्याचबरोबर 2G, 3G आणि 4G ला सुद्धा सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटी पर्यायामध्ये Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Wi-Fi hotspot, Bluetooth 4.0 LE सुद्धा आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo