Lenovo HX03F Spectra आणि HX03 Cardio फिटनेस ट्रॅकर्स भारतात झाले लॉन्च

Updated on 25-Apr-2018
HIGHLIGHTS

Lenovo ने या डिवाइस साठी ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart सोबत भागीदारी केली आहे आणि पुढे जाऊन कंपनी वियरेबल डिवाइस चा बिजनेस वाढवण्यासाठी Amazon इत्यादी ई-पोर्टल सोबत पण भागीदारी करेल.

Lenovo ने भारतात दोन नवीन फिटनेस ट्रॅकर्स HX03F Spectra आणि HX03 Cardio लॉन्च केले आहेत. हे फिटनेस ट्रॅकर्स Flipkart वर उपलब्ध होतील. HX03 Cardio आज पासून सेल साठी उपलब्ध होईल तर HX03F Spectra 3 मे पासून विकत घेता येईल. Lenovo HX03F Spectra ची किंमत Rs 2,299 आहे तर HX03 Cardio ची किंमत Rs 1,999 आहे. HX03F Spectra मध्ये कलर लार्ज डिस्प्ले, डायनामिक हार्ट रेट मॉनिटर, एक्टिविटी ट्रॅकर आणि मल्टी मास्टर इंटरफेस स्विचिंग फीचर आहे आणि हा IP68 सर्टिफाइड आहे ज्यामुळे हा वॉटर रेसिस्टेंट आहे. 
HX03 Cardio मध्ये 0.87 इंचाचा डॉट्स OLED डिस्प्ले, इंटेलीजेंट अलार्म क्लॉक आणि डिटेचेबल डायरेक्ट USB आहे. हा इनकमिंग कॉल्स आणि इनफार्मेशन रिमाइंडर्स पण दाखवतो आणि या डिवाइस मध्ये 80mAh ची बॅटरी आहे. लेनोवो मोबाईल बिजनेस ग्रुप चे एक्सेसरीज हेड Sebastian Peng ने सांगितले, “आम्ही भारतात लोकल मॅन्युफॅक्चर्स सोबत बोलणी सुरू केली आहे, ज्यामुळे हे डिवाइस भारतातच बनवता येतील, आम्ही प्रयत्न करत आहोत की हे काम याच वर्षी सुरू होईल."
Lenovo ने या डिवाइस साठी ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart सोबत भागीदारी केली आहे आणि पुढे जाऊन कंपनी वियरेबल डिवाइस चा बिजनेस वाढवण्यासाठी Amazon इत्यादी ई-पोर्टल सोबत पण भागीदारी करेल. सध्यातरी कंपनी आपले वियरेबल डिवाइस चीन मध्ये बनवत आहे पण आता भारतात आपल वियरेबल बिजनेस वाढवण्यासाठी कंपनी भारतातच यांची मॅन्युफॅक्चररिंग सुरू करू शकते. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :