Lenovo Z5 सह लॉन्च करण्यात आले Lenovo K5 Note, Lenovo A5 स्मार्टफोंस आणि Watch X

Lenovo Z5 सह लॉन्च करण्यात आले Lenovo K5 Note, Lenovo A5 स्मार्टफोंस आणि Watch X
HIGHLIGHTS

Lenovo ने या डिवाइस सह आपल्या ZUI यूजर इंटरफेस चा नवीन वर्जन पण लॉन्च केला आहे.

Lenovo ने काल चीन मध्ये आपला Lenovo Z5 डिवाइस लॉन्च केला आहे, पण या डिवाइस च्या लॉन्च मुळे निराशा झालेल्या लोकांची संख्या खुश झालेल्या लोकांपेक्षा जास्त आहे. या डिवाइस बद्दल माहिती समोर येत आहे की यात एक बेजल-लेस डिस्प्ले असेल, पण हा एका नॉच डिजाईन सह लॉन्च करण्यात आला आहे. या डिवाइस सोबत कंपनी ने आपले काही इतर डिवाइस पण लॉन्च केले आहेत. या डिवाइस सोबत कंपनी ने आपले दुसरे दोन स्मार्टफोंस आणि एक स्मार्टवॉच लॉन्च केला आहे. त्याचबरोबर आपल्या ZUI चा लेटेस्ट वर्जन पण लॉन्च केला आहे. 

Lenovo K5 Note आणि Lenovo A5 स्मार्टफोन
आधीच Lenovo K5 Note स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस एका 6-इंचाच्या HD+ डिस्प्ले 1440×720 पिक्सल च्या IPS डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोन 3GB रॅम आणि 32GB च्या स्टोरेज व्यतिरिक्त 4GB च्या रॅम सह 64GB च्या स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे. याच्या बेस वेरिएंट ची किंमत RMB 799 म्हणजे जवळपास Rs 8,300 आहे, तसेच याच्या टॉप वेरिएंट ची किंमत RMB 999 म्हणजे जवळपास Rs 10,400 आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo