मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन A7000 टर्बो सादर केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला कंपनच्या thedostore वर लिस्ट केले गेले आहे, ज्याची किंमत १०,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन बुधवारपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
लेनोवो A7000 टर्बो स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्ले ची पिक्सेल तीव्रता 401ppi आहे. हा स्मार्टफोन 64 बिट 1.7GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6752 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 2900mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीनुसार, हा 2G नेटवर्कवर ३९ तासांपर्यंत आणि 3G वर १६ तासांचा टॉक टाइम देईल. हा ११ दिवसांपर्यंत स्टँडबाय वेळ देईल.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE शिवाय स्मार्टफोनमध्ये वायफाय, GPS/A-GPS, ब्लूटुथ आणि मायक्रो-USB वैशिष्ट्य दिले गेले आहे. हा अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉपवर चालतो,ज्याच्यावर वाइब युआयचा वापर केला गेला आहे. हा मॅट काळ्या रंगात उपलब्ध होईल.