LeEco ने भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स Le 2 आणि Le मॅक्स 2 काही दिवसांपूर्वी भारतात लाँच केले. ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची पहिली फ्लॅश सेल २८ जूनला होईल. ह्याचे रजिस्ट्रेशन 20 जूनपासून सुरु होईल. हे दोन्ही स्मार्टफोन्स फ्लिपकार्ट आणि LeMall च्या माध्यमातून खरेदी करु शकता.
हा सेल २८ जूनला दुपारी १२ वाजल्यापासून सुरु होईल. त्याशिवाय रजिस्ट्रेशनची प्रक्रिया २८ जूनला ११ वाजता बंद होईल. त्यामुळे जर तुम्ही हे स्मार्टफोन्स घेऊ इच्छिता, आणि त्यात जर तुमच्याकडे SBI अकाउंट असेल, तर आपल्याला ह्यावर 10% चे कॅशबॅक मिळेल. ह्या स्मार्टफोनला SBI च्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून EMI वर सुद्धा खरेदी करु शकता.
ह्या दोन्ही स्मार्टफोन्ससह कंपनी CDLA इयरफोन्स देत आहेत, ज्याची किंमत १९९० रुपये आहे तर LeEco ची मेंबरशिप ४९०० रुपये आहे. ह्यासाठी आपल्याला कोणताही अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही. हे तुम्हाल मोफत मिळत आहे.
हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…
Le मॅक्स 2 कंपनीचा फ्लॅगशिप डिवाइस आहे आणि हा दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. ह्याचा एक व्हर्जन 4GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, तर दुसरा व्हर्जन 6GB रॅम आणि 64GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्याची किंमत २२,९९९ रुपये आणि २९,९९९ रुपये आहे. Le मॅक्स 2 मध्ये 5.7 इंचाची QHD डिस्प्ले दिली आहे. ह्यात 2.15GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसुद्धा दिला गेला आहे. हा फोन 21 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 3100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी J3 V स्मार्टफोन लाँच, सुपर AMOLED HD डिस्प्लेने सुसज्ज
हेदेखील वाचा – वनप्लस 3 चा सॉफ्ट गोल्ड व्हर्जन जुलैमध्ये होणार विक्रीसाठी उपलब्ध