मोबाईल निर्माता कंपनी LeEco ने भारतात बुधवारी आपले दोन नवीन स्मार्टफोन्स Le मॅक्स आणि Le 1S सादर केेले आहे. दोन्हीही स्मार्टफोन एक्सक्लूसिवरित्या फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील आणि ह्यांची विक्री फ्लॅश सेलच्या माध्यमातून केली जाईल.
कंपनीने आपल्या Le 1S स्मार्टफोनच्या 32B व्हर्जनची किंमत १०,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर Le मॅक्स स्मार्टफोनच्या 64GB व्हर्जनची किंमत ३२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीने Le मॅक्स स्मार्टफोनचा एक प्रीमियम व्हर्जन सादर केला आहे. ह्याचे नाव Le मॅक्स सफायर ठेवण्यात आले आहे. ह्याची किंमत ६९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
जर Le मॅक्स स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 6.33 इंचाची 2K डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 21 मेगापिक्सेलच्या रियर कॅमे-यासह आणि 4 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर आहे.
तर Le 1S च्या विषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन केवळ 7.5mm चा आकाराचा आहे. ह्यात मिडियाटेक हेलिओ X10 चिपसेट दिला गेला आहे, जो 2.2GHz ऑक्टा-कोर CPU वर चालतो आणि त्याशिवाय ह्यात 3GB ची रॅम दिली आहे. जर ह्याच्या अंतर्गत स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ३२जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिेले गेले आहे, ज्याला आपण वाढवू शकत नाही. ह्यात केवळ १६९ ग्रॅम इतकेच वजन आहे.
त्याशिवाय ह्यात 5.5 इंचाची IPS LCD डिस्प्ले 1080p रिझोल्युशनसह दिली गेली आहे. त्याचबरोबर पीक ब्राइटनेस 500 निट्स आहे, जी इतकी वाईट नाही. ह्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे आणि फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 13MPचा ISOCELL कॅमेरा सिंगल LED फ्लॅशसह दिला गेला आहे आणि जर ह्याच्या फ्रंट कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा 85 अंशाच्या वाइड अँगलसह दिला गेला आहे.