अलीकडेच भारतीय बाजारात LeEco Le 2 स्मार्टफोन लाँच झाला. १२ जुलैला ह्या स्मार्टफोनचा तिसरा फ्लॅशसेल झाला होता. आता कंपनीने आजपासून हा स्मार्टफोन ओपन सेलमध्ये उपलब्ध केला आहे. हा फोन कंपनीच्या ऑनलाइन शॉपिंग साइट Lemall आणि फ्लिपकार्टवर ओपन सेलमध्ये उपलब्ध झाला आहे.
Le 2 स्मार्टफोनची किंमत आहे ११,९९९ रुपये. ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे. हा फोन 1.8GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 3GB ची रॅम देण्यात आली आहे.
ह्या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. हा फोन 3000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
ह्या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा ड्यूल-टोन LED फ्लॅशने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.