मोबाईल निर्माता कंपनी LeEco ने अलीकडेच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Le 1S स्मार्टफोन लाँच केला होता. आता अशी बातमी मिळत आहे की, कंपनीने आपल्या ह्या फोनच्या नवीन व्हर्जनवर काम करणे सुरु केले आहे. ह्या स्मार्टफोनला LeEco Le 2 च्या नावाने संबोधित केले आहे आणि ह्याचा एक फोटोसुद्धा समोर आला आहे.
ह्या फोटोला मायड्रायवर्सद्वारा समोर आणले आहे. ह्या फोनमध्ये LeEco Le 2 स्मार्टफोनला प्रत्येक अँगलमधून पाहू शकतो. ह्या फोटोंमध्ये ह्यात सर्वात मोठा बदल दिसत आहे तो म्हणजे ह्याच्या रियर पॅनलवर LeTV लोगोच्या जागी ब्रँडिंगसाठी LeEco चा नवीन लोगो दिसत आहे. तथापि, Le 2 चा पुढचा भाग हा Le 1S स्मार्टफोनसारखाच दिसत आहे. Le सीरिजच्या ह्या आगामी फोनमध्ये स्पीकर ग्रीलसुद्धा Le 1S च्या जागेवरच देण्यात आले आहे.
ह्याच्या उजव्या बाजूला वॉल्यूम बटन देण्यात आले आहे. फोनचा रियर पॅनल पुर्णपणे बदलेला दिसत आहे. ह्या कथित Le 2 स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर राउंडच्या जागेवर एक चौकोन पाहता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 820 किंवा मिडियाटेक हेलियो X20 प्रोसेसर आणि 4GB ची रॅम असेल. फिंगरप्रिंट सेंसरमध्ये सुधारणा करुन ‘अल्ट्रासोनिक व्हरायटी’ असण्याचा सुद्धा दावा केला गेला आहे.
हेदेखील वाचा – काय आहे हा ‘Smartly.Me’ अॅप?
हेदेखील वाचा – हे आहेत भारतात मिळणारे सर्वोत्कृष्ट वॉटरप्रुफ स्मार्टफोन्स