LeEco च्या शॉपिंग पोर्टल LeMall वर कंपनी Le 2 स्मार्टफोन १ रुपयात मिळत आहे.
LeEco ने बुधवारी भारतीय बाजारात आपले दोन स्मार्टफोन्स Le 2 आणि Le मॅक्स 2 लाँच केले. त्याचबरोबर आपल्या ऑनलाइन शॉपिंग पोर्टल lemall.com ला सुद्धा सादर केले आहे. कंपनीने भारतीय बाजारात Le 2 स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र सध्यातरी काही वेळासाठी आपल्या शॉपिंग पोर्टल lemall.com च्या माध्यमातून कंपनी ह्या फोनला केवळ १ रुपयात देत आहे. पहिल्या 300 यूजर्सला हा डिवाइस १ रुपयात मिळेल आणि ह्याचे रजिस्ट्रेशन १५ जूनपासून दुपारी १२ वाजल्यापासून सुरु होईल.
LeEco Le 2 मध्ये 5.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. जर तुम्ही ह्याच्या प्रोसेसरवर एक नजर टाकली तर तुम्हाला कळेल की, हा 2.3GHz डेका-कोर मिडियाटेक हेलिओ X20 प्रोसेसरसह लाँच केला आहे. फोनमध्ये 3GB ची रॅम देण्यात आली आहे. सेच ह्यात 16 मेगापिक्सेलच रियर कॅमेरा ड्यूल टोन LED फ्लॅशसह आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये USB टाइप-C पोर्ट दिली आहे.