LeEco ने भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन LeEco Le 2 आणि Le मॅक्स 2 लाँच केले आहे. Le मॅक्स 2 कंपनीचा फ्लॅगशिप डिवाइस आहे आणि हा दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. ह्याचा एक व्हर्जन 4GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, तर दुसरा व्हर्जन 6GB रॅम आणि 64GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्याची किंमत २२,९९९ रुपये आणि २९,९९९ रुपये आहे. Le मॅक्स 2 मध्ये 5.7 इंचाची QHD डिस्प्ले दिली आहे. ह्यात 2.15GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसुद्धा दिला गेला आहे. हा फोन 21 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 3100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
तर Le 2 स्मार्टफोनची किंमत आहे ११,९९९ रुपये. ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे. हा फोन 1.8GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 3GB ची रॅम देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. हा फोन 3000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
हेदेखील पाहा – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू
दोन्ही डिवायसेसला मेटल बॉडीसह लाँच केले गेले आहे. ह्या दोन्ही फोन्समध्ये 3.5mm ऑडियो जॅकसुद्धा देण्यात आला आहे. दोन्ही USB टाइप-C पोर्टने सुसज्ज आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही अॅनड्रॉईड मार्शमॅलो v6.0.1 वर काम करतो.
हेदेखील वाचा – ऑनर 4X स्मार्टफोनला भारतात अॅनड्रॉईड मार्शमॅलो अपडेट मिळणे सुरु
हेदेखील वाचा – यू यूनिकॉर्न विरुद्ध मोटो G4 प्लसमध्ये कोण आहे सरस?