मोबाइल निर्माता कंपनी LeEco ने बाजारात आपले तीन नवीन स्मार्टफोन Le 2, Le 2 प्रो आणि Le मॅक्स 2 लाँच केले. सध्यातरी ह्या फोन्सना केवळ चीनच्या बाजारात लाँच केले गेले आहे. ह्या फोन्सला लाँच करण्यासाठी कंपनीने बीजिंगमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कंपनीने ह्या लाँच कार्यक्रमात एक VR हेडसेटसुद्धा लाँच केला.
जर ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, LeEco Le 2 आणि Le 2 प्रो स्मार्टफोन्समध्ये 5.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. तर Le मॅक्स 2 स्मार्टफोनला 5.7 इंचाची QHD डिस्प्ले सह लाँच केले गेले आहे.
जर ह्याच्या प्रोसेसरविषयी बोलायचे झाले तर, LeEco Le 2 ला 2.3GHz डेका-कोर मिडियाटेक हेलियो X20 प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे. तर Le 2 प्रोमध्ये डेका-कोर मिडियाटेक हेलियो X25 प्रोसेसर दिला गेला आहे. जर Le मॅक्स 2 च्या प्रोसेसरविषयी बोलायचे झाले तर, ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर दिला गेला आहे. ह्या फोन्सच्या रॅमविषयी बोलायचे झाले तर, LeEco le 2 मध्ये 3GB रॅंम, Le 2 प्रो मध्ये 4GB रॅम आणि Le max 2 मध्ये 6GB ची रॅम देण्यात आली आहे.
हेदेखील पाहा – २०१६ मधील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट अॅनड्रॉईड गेम्स (एप्रिल 2016)
LeEco le 2 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा ड्यूल टोन LED फ्लॅशसह सुसज्ज आहे. तर Le 2 प्रो आणि Le मॅक्स 2 स्मार्टफोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या तिनही स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. तिन्ही स्मार्टफोनमध्ये USB टाइप-C पोर्ट दिला आहे.
हेदेखील वाचा – ओप्पो F1 प्लस स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी झाला उपलब्ध
हेदेखील वाचा – आता ‘पिंक गोल्ड’ रंगातही मिळणार गॅलेक्सी S7, S7 एज स्मार्टफोन