LeEco Le 2 स्मार्टफोन टीनावर लिस्ट,१६ मेगापिक्सेल कॅमे-याने सुसज्ज
ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 3GB चे रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे.
LeEco Le 2 स्मार्टफोनला चीनची दूरसंचार नियामक टीनावर लिस्ट केले गेले आहे. ह्या लिस्टिंगमध्ये ह्या फोनच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली गेली आहे. येथे ह्या फोनचे काही फोटो दिले आहेत, ज्यात ह्या फोनचे डिझाईन अगदी स्पष्ट दिसतय. ह्या फोटोंमध्ये जो फोन दिसत आहे, हा फोन कंपनीच्या Le मॅक्स प्रो सारखा दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ह्या फोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या फोनमध्ये हेलिओ X20 चिपसेटसुद्धा आहे. फोनमध्ये 3GB चे रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे.
लिस्टिंगनुसार, ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. ह्या फोनचा आकार 151.1 x 74.1 x 7.7mm आणि वजन 153 ग्रॅम आहे. हया स्मार्टफोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – आयफोन SE, आयपॅड प्रो आता अधिकृतरित्या भारतात उपलब्ध
तथापि, कंपनीने अजूनपर्यंत ह्या फोनविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र आशा आहे की, कंपनी लवकरच हा फोन बाजारात आणेल.
हेदेखील वाचा – ५००० च्या किंमतीत येणारे दोन बजेट स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – आता कोणीही वाचू शकणार नाही तुमचे व्हॉट्सअॅप मेसेज