हा स्मार्टफोन २२,९९९ रुपयात ऑनलाइन शॉपिंग साइटवर लिस्ट झाला आहे. मात्र कंपनीने ह्या फोनच्या किंमतीविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
LeEco भारतात ८ जूनला आपले दोन नवीन स्मार्टफोन्स Le 2 आणि Le मॅक्स 2 लाँच करु शकतो. मात्र लाँच होण्याआधीच हा LeEco Le 2 स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. खरे पाहता, ऑनलाइन शॉपिंग साइट eBay वरुन आपण हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.
हा स्मार्टफोन २२,९९९ रुपयात ऑनलाइन शॉपिंग साइटवर लिस्ट झाला आहे. मात्र कंपनीने ह्या फोनच्या किंमतीविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. खरे पाहता, ह्या साइटवर केवळ दोन स्मार्टफोन्स सेलसाठी उपलब्ध होते, ज्यातील एक LeEco Le 2 स्मार्टफोन विकला गेला होता आणि एक LeEco Le 2 स्मार्टफोन स्टॉकमध्ये राहिला आहे.
जर ह्याच्या प्रोसेसरविषयी बोलायचे झाले तर, LeEco Le 2 ला 2.3GHz डेका-कोर मिडियाटेक हेलियो X20 प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे. तर Le 2 प्रोमध्ये डेका-कोर मिडियाटेक हेलियो X25 प्रोसेसर दिला गेला आहे. जर Le मॅक्स 2 च्या प्रोसेसरविषयी बोलायचे झाले तर, ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर दिला गेला आहे. ह्या फोन्सच्या रॅमविषयी बोलायचे झाले तर, LeEco le 2 मध्ये 3GB रॅंम, Le 2 प्रो मध्ये 4GB रॅम आणि Le max 2 मध्ये 6GB ची रॅम देण्यात आली आहे.