मोबाइल निर्माता कंपनी LeEco ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Le 1S भारतीय बाजारात सादर केला. कंपनीने एकाचवेळी आपले दोन मॉडल Le 1S आणि Le मॅक्स लाँच केले होते. आतापर्यंत हे स्मार्टफोन रजिस्ट्रेशनद्वारा एक्सक्लुसिव रिटेल पार्टनर फ्लिपकार्टवर उपलब्ध होता. मात्र २५ फेब्रुवारीपासून हा स्मार्टफोन कोणत्याही रजिस्ट्रेशनशिवाय फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.
LeEco ने अशी माहिती दिली आहे की, २५ फेब्रुवारीला LeEco डे म्हणून साजरा करेल. ह्या दिवशी कंपनीचे जवळपास 8 करोड प्रोडक्ट उपलब्ध होतील. ह्या कंपनीला पहिले LeTv ह्या नावाने ओळखले जात होते. LeEco चे १०,९९९ रुपयात मिळणारा Le 1S स्मार्टफोनला ग्राहकांद्वारे खास पसंत केले गेलेे आहे.
Le 1S विषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन केवळ 7.5mm चा आहे. त्याचबरोबर ह्यात मिडियाटेक हेलिओ X10 चिपसेट दिले गेले आहे, जो 2.2GHz ऑक्टा-कोर CPU वर चालतो. त्याशिवाय ह्यात 3GB ची रॅम दिली आहे. ह्याच्या अंतर्गत स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण वाढवू शकत नाही. त्याचबरोबर ह्याचे वजन १६९ ग्रॅम आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची IPS LCD डिस्प्ले 1080p रिझोल्युशनसह दिली आहे. त्याचबरोबर ह्याची पीक ब्राइटनेस 500 निट्स जी इतकी वाईटही नाही. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनच्या मागील बाजूकडे लक्ष दिले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिले गेले आहे. फोटोग्राफीसाठी ह्यात 13MP चा रियर कॅमेरा ISOCELL कॅमेरा सिंगल LED फ्लॅशसह दिला गेला आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.
हेदेखील वाचा- अशी बुकिंग करा फ्रीडम 251 स्मार्टफोनची
हेदेखील वाचा – मिजू M2 नोट विरुद्ध लेनोवो K3 नोट