स्मार्टफोन निर्माता कंपनी LeEco ने आपल्या Le 2 स्मार्टफोनचा ग्रे वेरियंट लाँच केला आहे. हा रोझ गोल्ड वेरियंटप्रमाणेच ह्या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये आहे. त्याचबरोबर ह्याची फीचर्ससुद्धा बरेच सारखेच आहेत. हा स्मार्टफोन खरेदी केल्यास यूजर्सला एका वर्षासाठी LeEco कॉन्टेंट इकोसिस्टमचे सब्सक्रिप्शन मिळेल. हा स्मार्टफोन LeMall आणि फ्लिपकार्टवर ११,९९९ रुपयात उपलब्ध आहे.
ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, LeEco Le 2 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. तसेच ह्यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर दिला गेला आहे. फोनमध्ये 3GB रॅम देण्यात आले आहे. त्याचबरोबर ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.
LeEco Le 2 स्मार्टफोनमध्ये 16MP चा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा ड्यूल टोन LED फ्लॅशने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. तसेच रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिले गेले आहे. स्मार्टफोनमध्ये USB-टाइप C पोर्टसुद्धा दिले आहे.