कूलपॅड आणि LeEco च्या भागीदारीतून बनलेला हा स्मार्टफोन १६ ऑगस्ट लाँच केला जाईल. वेईबो वरील एक टीजरसह कूलपॅडने ह्या बातमीला दुजोरा दिला आहे. ह्या स्मार्टफोनला १६ ऑगस्टला लाँच केले जाईल. जसे की ह्याआधी सांगितले गेले होते, की ह्या स्मार्टफोनचे नाव कूलपॅड कूल 1 असेल किंवा ह्या सारखेच काहीतरी असेल.
एका टीजरनुसार, कूलपॅड कूल 1 स्मार्टफोन १६ ऑगस्टला लाँच केला जाईल. अलीकडेच ह्या स्मार्टफोनचा एक फोटो समोर आला. ज्यात फोनचे बॅक पॅनल दाखवले गेले आहे आणि स्मार्टफोनमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअपसुद्धा आहे.
हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची डिस्प्ले असू शकते, जी एक 2k QHD डिस्प्ले असेल. त्याचबरोबर ह्यात स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसुद्धा असू शकतो. ह्यात 4GB रॅम आणि 64GB चे स्टोरेजसुद्धा मिळणार आहे. ह्यात आपल्याला 3500mAh ची बॅटरीसुद्धा असेल. तसेच ह्यात फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला आहे.
हा फोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालेल, त्याचबरोबर ह्यात EUI आणि CoolUI चा समावेश असू शकतो.
हेदेखील वाचा – आसूस झेनफोन सेल्फी ZD551KL लाँच, १२,९९९ रुपयाच्या किंमतीत अॅमेझॉनवर उपलब्ध
हेदेखील वाचा – LeEco भारतात लाँच केले तीन नवीन 4K UHD टीव्ही, किंमत ५९,७९० रुपयांपासून सुरु