LeEco-कूलपॅड कूल 1 ड्यूल स्मार्टफोनला बाजारात लाँच केले आहे. हा स्मार्टफोन दोन कंपन्यांनी मिळून बनवला आहे आणि सध्यातरी हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनचे तीन व्हर्जन बाजारात लाँच केले आहे, 3GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज असलेल्या व्हर्जनची किंमत 1099 युआन (जवळपास ११,०७४ रुपये), 4GB रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज असलेल्या व्हर्जनची किंमत 1499 युआन (जवळपास १५,१०६ रुपये) आणि 4GB रॅम 64GB व्हर्जनची किंमत 1699 युआन (जवळपास १७,१२१ रुपये) आहे. हा स्मार्टफोनला कूलपॅड, LeMall आणि Jd.com वरुन प्री-ऑर्डर केले जाऊ शकते. हा स्मार्टफोन गोल्ड, सिल्वर आणि रोझ गोल्ड रंगात उपलब्ध आहे.
हा स्मार्टफोन मेटल बॉडीने सुसज्ज आहे. ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. हा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात एड्रेनो 510 GPU सुद्धा आहे.
हेदेखील पाहा – [Marathi] LeEco Super 3 TVs – LeEco सुपर 3 टीव्ही फर्स्ट लूक
हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्या फोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि ड्यूल टोन LED फ्लॅशने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा सुद्धा दिला आहे. हा फोन 4060mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…
हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे आणि हा 4G VoLTE, वायफाय, फिंगरप्रिंट सेंसर, ब्लूटुथ, GPS सारख्या फीचर्सने सुसज्ज आहे.
हेदेखील वाचा – BSNL ने आपल्या लँडलाइन यूजर्ससाठी केली मोफत अनलिमिटेड कॉलिंगची घोषणा
हेदेखील वाचा – सॅमसंगने भारतात लाँच केला गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन, किंमत ५९,९९० रुपये
Coolpad Cool 1 अमेज़न पर 13,999/- रूपये में खरीदें