आयफोन 7 प्लसच्या केसला पाहून असे वाटतय की, ह्यात 3 पिन स्मार्ट कनेक्टर असेल, जसे आयपॅड प्रो मध्ये पाहिले गेले होते.
अॅप्पल लवकरच बाजारात आपले दोन नवीन फोन आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच करेल. मागील अनेक दिवसांपासून ह्या दोन्ही फोन्सविषयी अनेक लीक्स समोर येत आहेत. आणि आता ताज्या रिपोर्टनुसार, आयफोन 7 प्लस स्मार्टफोनचे डिझाईन समोर आले आहे. 9to5Mac च्या एका रिपोर्ट असा दावा केला आहे की, आयफोन 7 प्लसच्या केसला पाहून असेच वाटत आहे की, ह्यात 3 पिन स्मार्ट कनेक्टर असेल, जसे आयपॅड प्रोमध्ये पाहिले गेले होते. ह्याच्या माध्यमातून डाटा आणि पॉवर ट्रान्सफर केली जाऊ शकते.
तसे आयपॅड प्रोमध्ये असलेल्या स्मार्ट कनेक्टरद्वारा किबोर्ड आणि अनेक प्रकारचे डॉक्सला कनेक्ट केले जाते. आयपॅड प्रो च्या तुलनेत आयफोन 7 प्लस खूपच छोटा डिवाइस आहे. ह्यात वायरलेस चार्जिंग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.