LeEco Le 2 (Le Max 2) स्मार्टफोन 6GB रॅमच्या बेंचमार्क साइटवर लिस्ट

Updated on 19-Apr-2016
HIGHLIGHTS

आपला आकर्षक स्मार्टफोन आणि पहिला स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर असलेला स्मार्टफोन लाँच केल्यानंतर कंपनी आता आपल्या इतर खास स्मार्टफोनवर काम करत आहे.

आपला आकर्षक स्मार्टफोन आणि पहिला स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर असलेला स्मार्टफोन लाँच केल्यानंतर कंपनी आता आपल्या इतर खास स्मार्टफोनवर काम करत आहे. ह्या स्मार्टफोनविषयी अनेक लीक्स ह्याआधी समोर आले आहेत आणि आता ह्या स्मार्टफोनला एक बेंचमार्क साइटवर लिस्ट केले गेले आहे.

ह्या स्मार्टफोनला Le 2, Le 2 प्रो किंवा Le मॅक्स 2 अशा नावाने ओळखले जाऊ शकतो. अजूनपर्यंत तरी ह्याच्या सुनिश्चित नावाविषयी कोणताही खुलास करण्यात आलेला नाही. मात्र कदाचित हा Le 2 नावाने ओळखला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन काही खास हार्डवेयर सह येईल.

हेदेखील वाचा – १००० च्या किंमतीत येणारे सर्वोत्कृष्ट हेडफोन्स

ह्याचा पहिला व्हर्जन 3GB रॅमसह, दुसरा 4GB रॅम आणि आणि त्याशिवाय अन्य 4GB रॅमसह येऊ शकतो. ह्याचा हा मॉडल GFX बेंच डाटाबेसमध्ये पाहिले गेले आहे. ह्या स्मार्टफोनवर ह्याला टेस्टसाठी रन केले गेेले आहे.

त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची QHD डिस्प्लेसह 21MP चा रियर कॅमेरा असेल, जो 4K व्हिडियो घेण्यासही सक्षम असेल. त्याशिवाय ह्यात 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असेल. हा सुद्धा QHD व्हिडियो घेण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर ह्यात 64GB चे स्टोरेज असेल आणि हा स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह येईल. त्याशिवाय ह्याला अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोसह लाँच केले जाईल.

हेदेखील वाचा – Creo Mark 1 स्मार्टफोन विक्रीसाठी झाला उपलब्ध
हेदेखील वाचा – फ्लिपकार्ट सॅमसंग वीक: सॅमसंगच्या फोन्सवर मिळतोय आकर्षक डिस्काउंट

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :