Lava Z91 स्मार्टफोन भारतात लॉन्च, फेस अनलॉक फीचर आणि 18:9 रेश्यो वाला डिस्प्ले सर्वात खास फीचर

Lava Z91 स्मार्टफोन भारतात लॉन्च, फेस अनलॉक फीचर आणि 18:9 रेश्यो वाला डिस्प्ले सर्वात खास फीचर
HIGHLIGHTS

Lava ने अपनी Z सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, हा स्मार्टफोन Lava Z91 नावाने लॉन्च केला गेला आहे.

Lava ने अपनी Z सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, हा स्मार्टफोन Lava Z91 नावाने लॉन्च केला गेला आहे. या सीरीज मध्ये कंपनी जवळ आधीच खुप डिवाइस आहेत, यात Lava Z60, Lava Z70, Lava Z80 आणि Lava Z90 स्मार्टफोन यांचा समावेश आहे. हे स्मार्टफोंस मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये सादर करण्यात आले होते. कंपनी ने या नव्या स्मार्टफोन Lava Z91 ला फक्त Rs 9,999 मध्ये सादर केले आहे. 

या स्मार्टफोन बद्दल अजुन बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन कंपनी ने स्टार OS 4.2 वर आधारित एंड्राइड 7.1 नौगट सह लॉन्च केले आहे. याव्यतिरिक्त यात एक 5.7-इंचाचा HD+ FullView डिस्प्ले 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह 720×1440 पिक्सल रेजोल्यूशन सह देण्यात आला आहे. तसेच हा एका 2.5D कर्व पॅनल सह लॉन्च झाला आहे. 

स्मार्टफोन च्या परफॉरमेंस बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस मीडियाटेक च्या MTK6739 प्रोसेसर आणि 3GB रॅम सह लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये तुम्हाला तुमचे फोटो आणि इतर फाईल्स स्टोर करण्यासाठी 32GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवू शकता. 
याव्यतिरिक्त स्मार्टफोन मध्ये फोटोग्राफी साठी असलेला कॅमेरा पाहत या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा फ्लॅश लाइट सह देण्यात आला आहे, याव्यतिरिक्त याचा फ्रंट कॅमेरा म्हणून यात एक 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे. 

तसेच या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेंसर सोबत एक फेस रिकग्निशन फीचर पण मिळत आहे, ज्यातून तुम्ही तुमच्या चेहर्‍याने तुमचा फोन अनलॉक करू शकता. यासोबतच या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 3000mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.

सोबतच तुम्हाला या स्मार्टफोन सह 2-वर्षांची वारंटी मिळत आहे, तसेच एकदा तुम्ही स्क्रीन पण रिप्लेस करू शकता. आणि जर तुम्ही एयरटेल ग्राहक असाल तर तुम्हाला या स्मार्टफोन सोबत एक खास ऑफर पण मिळत आहे, या ऑफर अंतर्गत तुम्हाला Rs 2,000 चा एयरटेल कडून कॅशबॅक पण मिळणार आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo