भारतासाठी Lava Z50 ची घोषणा, एंड्रॉइड गो (ओरियो एडिशन) आणि 4.5 इंचाचा डिस्प्ले असेल
हा स्मार्टफोन मार्च 2018 च्या मध्यापासून उपलब्ध होईल आणि एंड्रॉयड ओरियो (गो एडिशन) वर चालेल.
लावा ने भारतासाठी आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन Lava Z50 ची घोषणा केली आहे, जो एंड्रॉयड ओरियो (गो एडिशन) वर चालेल. हा मार्च 2018 च्या मध्यापासून ब्लॅक आणि गोल्ड कलर मध्ये उपलब्ध होईल. याचा उद्देश्य स्मार्टफोन यूजर्सना एका फीचर फोन वरून स्मार्टफोन वर अपग्रेड करणे आहे.
हा फोन 2 वर्षाच्या वॉरंटी सह येईल आणि याला एयरटेल सोबत 2,000 कॅशबॅक ऑफर सह बंडल करण्यात आले आहे. एका विशेष लॉन्च ऑफर अंतर्गत, डिवाइस विकत घेतल्यावर एका वर्षाच्या आत स्क्रीन तुटल्यास कंपनी एकदा फ्री स्क्रीन-रिप्लेसमेंट देणार आहे.
स्पेसिफिकेशन पाहता Lava Z50 मध्ये प्रोटेक्शन साठी टॉप वर एक कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सह 4.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा मीडियाटेक MT6737m क्वॉड-कोर प्रोसेसर वर चालतो. हा डिवाइस 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज सह येतो. यात फ्लॅश सोबत 5MP चा रियर आणि फ्रंट कॅमेरा आहे, जो बोके शॉट्स कॅप्चर करण्यास पण सक्षम असेल.
अल्काटेल ने मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 मध्ये एंड्रॉयड ओरेओ (गो एडिशन) वर चालणारा पहिला स्मार्टफोन सादर केला होता. नोकिया ने पण आपल्या एंट्री लेवल नोकिया 1 चा खुलासा केला आहे, जो हलक्या एंड्रॉइड ओएस वर चालेल आणि आता Lava ने पण यात पाउल टाकले आहे. यावरुन येणारे एंट्री लेवल स्मार्टफोन कशे असतिल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.