कंपनी आता लवकरच Lava Yuva सिरीजचा पहिला युवा 5G फोन सादर करणार
Lava ने X अकाउंटवर पोस्ट शेअर करत Lava Yuva 5G फोनच्या भारतीय लाँचबद्दल माहिती दिली
Lava Yuva 5G सुमारे 10 रुपयांच्या रेंजमध्ये येऊ शकतो.
Lava Yuva 5G: देशी कंपनी Lava सातत्याने भारतीय वापरकर्त्यांना परवडणाऱ्या किमतीत उत्तम स्मार्टफोन्स ऑफर करत आहे. अलीकडेच कंपनीने बरेच स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. दरम्यान, कंपनी आता लवकरच Lava Yuva सिरीजचा पहिला युवा 5G फोन सादर करणार आहे. ब्रँडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि कंपनीच्या वेबसाइटवर टीझर जारी करून ही माहिती दिली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती-
Lava ने कंपनीच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आगामी फोनच्या भारतीय लाँचबद्दल माहिती दिली आहे. तुम्ही पोस्टमध्ये बघू शकता की, Lava Yuva 5G फोनचा टीजर Video ‘Coming soon’ सह शेअर केला गेला आहे.
तुम्ही टीझर व्हिडिओमध्ये बघू शकता की, Lava Yuva 5G फोनमध्ये एक मोठा गोलाकार कॅमेरा मॉड्यूल आहे. ज्यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश आहे. फोनच्या मागील कॅमेरामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा लेन्स असण्याची अपेक्षा आहे. Lava Yuva 5G सुमारे 10 रुपयांच्या रेंजमध्ये येऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Lava Yuva 5G चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स
बेंचमार्क सूचीनुसार, नवीन Lava Yuva 5G ला दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये प्रवेश मिळू शकतो. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 8GB रॅम दिला जाऊ शकतो. यासोबत 128GB स्टोरेज देखील मिळण्याची शक्यता आहे. लिस्टिंगनुसार, फोनमध्ये 5G-आधारित MediaTek Dimensity प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला 16MP लेन्स असेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.