Lava Yuva 3 Pro स्मार्टफोन भारतात बजेट रेंजमध्ये लाँच
Lava Yuva 3 Pro स्मार्टफोनची किंमत केवळ 8,999 रुपये
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP AI रियर कॅमेरा आहे.
Lava Yuva 3 Pro स्मार्टफोन भारतात बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 9000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला आहे. Lava चा हा फोन लूक आणि स्पेसिफिकेशन्स या दोन्ही बाबतीत अगदी अप्रतिम आहे. हा स्मार्टफोन तीन आकर्षक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Lava Yuva 3 Pro ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
कंपनीने हा Lava Yuva 3 Pro फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे, ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन डेझर्ट गोल्ड, फॉरेस्ट विरिडियन आणि मेडो पर्पल कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच, या लेटेस्ट लावा फोनची विक्री ई-स्टोअरवर सुरू देखील झाली आहे. एवढेच नाही तर, हे उपकरण ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून देखील खरेदी केले जाऊ शकते. विशेष म्हणजे वॉरंटी कालावधीत कंपनी या फोनसाठी होम सर्व्हिसही देत आहे.
Lava Yuva 3 Pro
Lava चा हा फोन प्रीमियम आणि स्टायलिश लुकसह लाँच झाला आहे. यामध्ये प्रीमियम ग्लास बॅक डिझाइन आहे. फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz इतका आहे. फोन 8GB RAM सह 8GB व्हर्च्युअल रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. त्याबरोबरच, या हँडसेटमध्ये UNISOC T616 प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP AI रियर कॅमेरा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP कॅमेरा देखील आहे. Lava Yuva 3 Pro मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. यात चार्जिंगसाठी तुम्हाला USB Type-C पोर्ट मिळेल. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये अनेक फीचर्स आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.